MY BEST FRIENDS POEM

तुझी माझी मैत्री जगाला कळावी…
मी सोबत असताना ‘ती’ सुद्धा जळावी…
अचानक तुला पाहून ‘हास्य’ माझं खुलावं…
मला गरज असताना तू पुढे यावं..
मैत्रीचं हे नातं कायम असं रहावं…

साथ ही आपली जन्मभर असेल…
तू एकटा असताना मी तुला दिसेल…

विनाकारण मैत्री तुटते ती मैत्रीच कसली
मैत्री अशी हवी जी खोलवर रुजलेली ।।१।।

मैत्रीच्या कोशात कदापि वेदना जराही नसते
संभाषणा विन मैत्री मनी अतिशय त्रास देते ।।२।।

सुख दुःखाचे देणे घेणे आपसात होत असते
त्या मैत्रीला डाग लागतो एकतर्फी विचारांते ।।३।।

मैत्री मध्ये बांधिलकी असते एकमेकां बांधून ठेवते
म्हणूनच मैत्री शत्रू पासून एकमेकांचा सांभाळ करते ।।४।।

मैत्री नेहमी गडद असावी शेवट पर्यंत ती निभवावी
मैत्री मध्ये त्याग असावा एकमेकां किंमत द्यावी ।।५।।

मैत्री हवी कृष्ण-सुदामा सम त्यात हवी शुभ भावना
नजरे पासून दूर असता तिला मिळते गती चालना ।।६।।

मैत्रीत असते ओठीं गोड हास्य
सुखदुःखाची ओळख असते मैत्री
मैत्रीत नसतो भेदभाव अंतरीं
अंता पर्यंत राहे ती मैत्री खरी ।।१।।

रंगा वाचून निसर्ग फिका
गन्धा वाचुन सुमने फिकी
रंग माणुसकीचा मैत्रीत असतो
एकाकीपणा नकोसा वाटतो ।।२।।

खडतर समयी मैत्रीच आधार देते
मैत्री विना जीवन असह्य होते
मैत्री खरी ती उत्तम संस्कार देते
जिवनाची सत्यता मैत्रीत होते ।।३।।

मैत्री नेहमी गाळून घ्यावी
कसास लावूनी पुढे न्यावी
भेदभाव मनी कधी नसावा
विश्वास नेहमी तिचा असावाmy friend bhushan patilnivrutte patil&ashutosh patillvinod patilakash patil&dipak patil